डोंबिवली : एकेकाळी फर्स्ट डे फर्स्ट पाहण्यासाठी सकाळपासून तिकीट खिडकीबाहेर रांगा लागायच्या. अमुक एका चित्रपटाचे (Movie Theater) पहिले तिकीट खरेदी कले की अभिमानाने मिरवत आसत. पण आता गेल्या तीन चार वर्षांपासून एकदाही सिनेमागृह (Cinema Hall) गेलो नाही. हे दुर्दैवाने अभिमानाने सांगितले जात आहे.
सिनेमागृहे मल्टीप्लेक्स मध्ये झाल्यांने सिंगल स्क्रीन सिनेमा गृह एकापाठोपाठ बंद होत चालली आहेत. याविषयी बोलताना चित्रपटगृहांचे व्यावस्थापक आशिष ठक्कर जड अंतःकरणाने म्हणाले, पुर्वी सिंगल स्क्रीन थिएटर सुमारे एक हजार आसन क्षमतेची होती. एकढी मोठी आसन क्षमतेची थिएटर यापुढे चालवणे जिकीरीचे आहे. कारण मिल्टीप्लेक्समध्ये चित्रपटगृहामुळे तसेच आसन क्षमतेने टॉकीज होऊ लागली. कोरोनानंतर सिनेप्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचे प्रमाण फारच कमी झालेले आहे. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटाचे तिकीटाचे दर ही प्रमाणात बाहेर वाढले हे एक कारण आहे. अशी सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनची तक्रार आहे. तसेच आठवडाभर सगळे दिवस पिक्चर चालला नाही तर त्याचा मोठा तोटा सहन करावा लागतो. पाच स्क्रीन आसले तरी शो लावणे परवडत नाही हे दुर्दैव आहे. मल्टिप्लेक्स आले तेंव्हापासून सिंगल स्क्रीन व्यावसायिकांचा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात कोरोना सारख्या महामारीमुळे व्यावसायावर परिणाम झाला आहे असे थिएटर मालकांनाचे म्हणणें आहे.
आता हाऊसफुल्ल अशक्य
एकेकाळी तिकीट मिळत नसायची फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारे रद्दी होते.आतातर वर्षानवर्षे न येणारे नागरिक आहेत.काळानुसार बदल होणे अपेक्षित असले तरी सिंगल स्क्रीनबाबत होत्याचे नव्हते झाले,असे सिनेमा गृह मधील कर्मचारी म्हणतात. तसेच पूर्वी टीव्ही छोटे होते आणि टॉकीज मधील स्क्रीन मोठी होती. आता घरोघरी मोठे टीव्ही आलेत व होम थिएटर संकल्पना आली. त्यानंतर मोबाईलवर सर्व प्रकारची करमणूक उपलब्ध झाली. या सर्व कारणांमुळे टॉकीज मधील दिवसेंदिवस गर्दी कमी झाली आहे, असे आशिष ठक्कर सिनेमा थिएटर व्यावसायिक यांनी म्हटले.