Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीउदयपूरमध्ये शाळकरी भांडणामुळे हिंसाचार!

उदयपूरमध्ये शाळकरी भांडणामुळे हिंसाचार!

इंटरनेट बंद, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, कलम १४४ लागू

उदयपूर : उदयपूरमध्ये दहावीतील एका विद्यार्थ्यावर त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. हल्ल्याच्या नंतर शहरातील वातावरण खूपच बिघडले आणि काही ठिकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला आणि कलम १४४ लागू केले आहे.

घटनेनंतर उदयपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शहरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, १७ ऑगस्टपासून पुढील सूचनांपर्यंत सर्व सरकारी आणि निमसरकारी शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

या घटनेचा तपास करताना, दोन विद्यार्थ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून भांडण झाल्याचे समोर आले. हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जमावाने हिंसक निदर्शने केली आणि काही गाड्या जाळल्या. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

जिल्हाधिकारी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. उदयपूरमध्ये स्थिती तणावपूर्ण असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -