Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीPune News : पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन!

Pune News : पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन!

वाहतुकीत मोठे बदल; अनेक रस्ते बंद

पुणे : जुलै महिन्यापासून राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. अशातच स्वातंत्र्यदिन यादिवशी पात्र महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महिलावर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज पुणे शहरातील बालेवाडी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे. या दरम्यान बालेवाडी परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहे.

कोणते मार्ग बंद?

पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील राधा चौक ते मुळा नदी पुलापर्यंतचे सर्व सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. यावेळेत फक्त कार्यक्रमात सहभागी होणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांना बांतर भवन आणि बालेवाडीतील इतर परिसरात पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील रस्ते देखील बंद ठेवण्यात येणार आहे. आज शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीचे हे बदल लागू असतील.

त्याचबरोबर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, पुणे-सोलापूर महामार्ग आणि पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार आहे. तर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक देखील अवजड वाहनांसाठी बंद राहील. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत केली जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -