Nitesh Rane : उनका अली, हमारा बजरंग बली!

आमदार नीतेश राणे यांचा उल्हासनगरमधील हिंदूंना दिलासा


उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या मुस्लिम धर्मांतराविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेत त्यांची कहाणी ऐकली. या मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत हा हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर बोलताना नितेश राणे यांनी ‘उनका अली, हमारा बजरंग बली’ अशी घोषणा देत भाषण केले.


जोपर्यंत यांच्या घरात लव्ह जिहाद होत नाही, तोपर्यंत यांना झळ बसणार नाही, असे म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत आणि आम्ही काही सरकारमधून जात नाही हे लक्षात ठेवा, असे म्हणत त्यांनी पोलिसांनाही थेट इशारा दिला.


‘उल्हासनगरच्या एकेका घरात ४०-४० बांगलादेशी आणि रोहिंगे राहात असून ते कुणाच्या परवानगीने इथे राहत आहेत?' असा सवाल नितेश राणे यांनी केला. त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नसल्यामुळे 'तुम्ही आम्हाला फक्त २४ तास द्या, या २४ तासात या सर्वांना इथून साफ करून टाकू’ असा आव्हान त्यांनी दिले. तसेच ‘आम्ही काही सरकारमधून जात नाही. तुमचे जे काही आहे, ते आमच्याच हातात आहे. तुम्हाला हे बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत, असे म्हणत त्यांनी पोलिसांना इशारा दिला. तसेच ‘हा मोर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांविरोधात जर गुन्हे दाखल केले, तर पोलीस स्टेशनला येऊन तांडव करेन’, असेही वक्तव्य नितेश राणे यांनी यावेळी केले.


यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले. तसेच या सगळ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment

Indian Superfoods : फिट राहायचंय? मग विदेशी नव्हे, आहारात आजच समाविष्ट करा हे देशी सुपरफूड्स

मुंबई : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक जण चिया सीड्स, क्विनोआ, अवोकाडो, ब्लूबेरी यांसारख्या महागड्या विदेशी

Water Intake : मानवी शरीराला किती पाणी आवश्यक असते; रोज किती पाणी प्यावे? सविस्तर माहिती

तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? आपल्या शरीराला किती लीटर पाणी पुरेसे असते, अति प्रमाणात पाणी प्यायल्याने काय

Old Saree Reuse : फेकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! जुन्या साडीपासून बनवा घरासाठी 'या' 8 शानदार गोष्टी

तुमच्याही कपाटात जुन्या साड्या पडून आहेत का? त्या फेकून देण्याचा विचार करत असाल, तर आधी एकदा थांबा! कारण या जुन्या

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

`Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून तयार होणारा औषधी काढा कसा बनवायचा चला पाहूया पावसाळा सुरू

Simhastha Kumbh Mela 2027 : पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर तांत्रिक सल्लागार समितीची चर्चा

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, शाश्वत आणि भाविकाभिमुख करण्याच्या दृष्टीने स्वच्छता, घनकचरा