Sunday, July 6, 2025

Devendra Fadnavis : नालायकांनो आई, बहिणीचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही

Devendra Fadnavis : नालायकांनो आई, बहिणीचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले


पुणे : महायुतीचे सरकार ‘देना बँक’ सरकार आहे. लेना वाले नाही. मागच्या काळात वसुली करणारे सरकार होते. एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये पोहोचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. विरोधक म्हणतात की पंधराशे रुपयात महिलांना विकत घेत आहेत. नालायकांनो आई, बहिणीचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही. ही योजना माता-भगिणींच्याप्रती कृतज्ञता आहे. त्यांचे प्रेम, साथ यामुळे आम्हाला यश मिळते. परंतु, जे लोक सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आले. त्यांना पंधराशे रुपयांचे मोल समजू शकत नाही, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर केली.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडीत करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की परकीयांचे आक्रमण ज्यावेळी आमच्यावार होत होते, त्यावेळी आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात सुरु झाली. केवळ राजकारण नाही तर समाजकारण, परिवर्तनाची पुणे ही भूमी आहे. त्यामुळे पुण्यातून या योजनेचा शुभारंभ केला. महायुतीचे सरकार ‘देना बँक’ सरकार आहे. लेना वाले नाही. मागच्या काळात वसुली करणारे सरकार होते. एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये पोहोचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे एकत्रित पैसे दिले जातील. ही खटाखट सारखी नव्हे फटाफट योजना आहे. थेट खात्यांमध्ये पैसे जातात. बहिणींना ओवाळणी द्यायची म्हटल्यावर सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. न्यायालयात गेले. न्यायालयाने नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक अर्जावर पुरुष, दुचाकी, बगीच्याचे छायाचित्र वापरले. अर्ज बाद होण्यासाठी कारस्थान केले. संकेतस्थळ बंद पडण्यासाठी डेटा (विदा) टाकला.


महिलांचा विकास झाला तरच भारत पुढे जाईल. महिला केंद्रीत योजना सुरु केल्या आहेत. लखपती, लेक लाडकी योजना सुरु केली. अर्थव्यस्थेच्या मुख्य धारेत महिलांना भागीदारी मिळाली पाहिजे. महिलांना अर्थव्यस्थेच्या केंद्रात आणल्यास राज्याची अर्थव्यस्था वेगात वाढेल. पूर्वी सरकारी योजना दलालांची होत होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीची योजना सुरु केली आहे. आधार, बँक आणि मोबाईल या त्रिशुळमुळे थेट खात्यात पैसे पडले. दलालांचा धंदा बंद केल्याचेही फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा