Wednesday, March 19, 2025
HomeदेशDoctors strike : कोलकाता बलात्कारप्रकरणी उद्या डॉक्टरांचा संप; देशातील दवाखाने राहणार बंद!

Doctors strike : कोलकाता बलात्कारप्रकरणी उद्या डॉक्टरांचा संप; देशातील दवाखाने राहणार बंद!

मुंबई : देशातील बलात्काराच्या (Rape) आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक बाब आहे. त्यातच कोलकात्यात (Kolkata news) आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या विरोधात देशभरातून आवाज उठवण्यात आला. आता इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील (IMA) १७ ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या या घटनेच्या निषेधार्थ देशव्यापी संप (Doctors strike) पुकारला आहे. यासाठी आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयएमएने एक पत्रक काढून १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्ट सकाळी ६ ते १८ ऑगस्ट सकाळी ६ अशा तब्बल २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसुतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ या २४ तासांत खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार आहेत.

जवळपास २५ राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले, तरी त्याची अंमबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये ५० टक्के महिला डॉक्टर असतील तर महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

कोलकाता शहरात तणाव

कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या आदेशानुसार आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -