मुंबई: आज संपूर्ण भारत देश ४८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या निमित्ताने अनेक टेलिकॉम कंपन्यां अनेक खास ऑफर्स देत आहेत. या निमित्ताने जिओनेही अशीच ऑफर सादर केली आहे. ही ऑफर नक्कीच एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि खासकरून बीएसएनएलला मोठी टक्कर देऊ शकतात.
जिओच्या या ऑफरचे नाव फ्रीडम ऑफर आहे. जिओची ही खास ऑफर त्या लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या घरी वायफाय लावायचे आहे. जर तुम्ही एअरटेल, व्हीआय अथवा बीएसएनएलप्रमाणेच कोणतीही ब्रॉडबँड सर्व्हिस देणारी कंपनी वायफाय सर्व्हिस आपल्या घरी लावत असेल तर त्यासाठी वन टाईम इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागते.
रिलायन्स जिओची वायफाय सर्व्हिस म्हणजेच जिओ एअरफायबरला इन्स्टॉल करण्यासाठी ग्राहकांना वन टाईम इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागतात याची फी १००० रूपये आहे. दरम्यान, जिओने स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने जिओ एअरफायबर आपल्या नव्या ग्राहकांना फ्री इन्स्टॉलेशन सर्व्हिस देण्याची ऑफर आणली आहे.
याचा अर्थ जर तुम्ही जिओ एअरफायबरची नवी सर्व्हिस आपल्या घरी लावत असाल तर तुम्हाला १००० रूपये वन टाईम इन्स्टॉलेशन फी द्यावी लागणार नाही. तुम्ही सरळ १००० रूपयांची बचत करू शकता. दरम्यान, जिओच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल.
जिओची ही फ्रीडम ऑफर ३ महिन्याच्या ब्रॉडबँड प्लानसाठी आहे. जिओच्या या प्लानसाठी युजर्सला २१२१ रूपये खर्च करावे लागतील. या एअरफायबर प्लानसोबत युजर्सला ३० एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड, १००० जीबी डेटा, १४ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…