Navra maza navsacha 2 : प्रवासाला येताय ना? नवरा माझा नवसाचा २ चा धमाकेदार टीझर आऊट!

२० सप्टेंबरपासून होणार धमाल सुरु


मुंबई : 'नवरा माझा नवसाचा' (Navra maza navsacha) या मराठीतल्या सुपरडुपर हिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित या चित्रपटात यंदा कोकण रेल्वेचा प्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर आज प्रदर्शित (Teaser out) झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांनी या टीझरवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


काही दिवसांपूर्वी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. “‘नवरा माझा नवसाचा २’च्या टीझरने आज नॉनस्टॉप कॉमेडी एक्स्प्रेसच्या प्रवासाला सुरुवात होतेय”, असं कॅप्शन देत लेखक, दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.


चित्रपटाच्या पहिल्या भागात शेवटी चोरी झालेले हिरे मिळाल्याचं दाखवलं होतं. आता दुसऱ्या भागात टीझरच्या सुरुवातीलाच एक वृत्तनिवेदिका सरकारी तिजोरीतून हिऱ्यांची चोरी झाल्याची बातमी देते. दोन चोर हे हिरे चोरुन पसार झाल्याचं समजतं. तर दुसऱ्या बाजूला भक्ती व वॅकी आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करताना दिसत आहेत. पण यावेळी बाप्पाची मूर्ती हरवल्यामुळे भक्ती गोंधळ घालताना दिसते. या कोकण प्रवासादरम्यान बरीच धमाल होताना दिसत आहे. टीझरचा शेवट बाप्पाच्या जयघोषात होतो शिवाय बाप्पाची मूर्ती देखील सापडल्याचं पाहायला मिळतं. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात (Navra Maza Navsacha 2) तो हिरे चोरणारा कोण असेल? आणि बाप्पाची हरवलेली मूर्ती कशी सापडते? हे पाहणं रंजक ठरणार आहे.


'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे २० सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या

CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक