Central Railway : मध्य रेल्वे सुट्टीत चालवणार १८ विशेष सेवा!

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष गाडी गुरुवार १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी १२.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. येताना १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १. ३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. हि गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल .


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - मडगाव विशेष


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून गुरुवार १५ ऑगस्ट आणि शनिवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. येताना मडगाव येथून शुक्रवार १६ ऑगस्ट आणि रविवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १२.४० वाजता पोहोचेल.


हि गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर , खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड , संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, आणि कणकवली येथे थांबेल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर विशेष


मंगळवर २० ऑगस्ट रोजी सकाळी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी दुपारी १ . ३० वाजता पोहोचेल. रविवार १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल.


हि गाडी कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबेल .


पुणे - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष


गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुणे येथून संध्याकाळ ४. १० वाजता सुटेल आणि १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथे ६.३० वाजता पोहोचेल. बुधवार १४ ऑगस्ट आणि शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून संध्याकाळी ७. ४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. हि गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.


कलबुर्गी - बेंगळुरू विशेष


गुरुवार १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवारी १७ ऑगस्ट रोजी रोजी कलबुरगि येथून सकाळी ९. ३० वाजता सुटेल श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी बुधवार १४ ऑगस्ट शुक्रवार १६ ऑगस्ट आणि गुरुवार १७ ऑगस्ट रोजी श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथून २१.१५ वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे ७.४५ वाजता पोहोचेल.


हि गाडी शाहबाद, वाडी, यादगिर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि, गुंटकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका येथे थांबेल.


या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू आहे.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक