९२.९७ नंबरची कार, १० कोटी रूपये, सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव

लाहोर: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा अर्शद नदीम सातत्याने चर्चेत आहे. त्याने इतिहास रचताना ४० वर्षात पाकिस्तानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदकच जिंकून दिले नाही तर ९२.९७ मीटर थ्रो करत ऑलिम्पिकमध्येही रेकॉर्ड केला.


त्याच्या या जबरदस्त कामगिरीनंतर सगळीकडूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच पाकिस्तानचे पंजाबचे मुख्यमंत्री मरियम नवाजही मंगळवारी अर्शद नदीमला भेटण्यासाठी त्याच्या घरी गृहनगर मियां चन्नू पोहोचले. या दरम्यान त्यांनी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्शदला १० कोटी रूपयांचा चेक दिला.


मुख्यमंत्री मरियम हेलिकॉप्टरमधून मियां चन्नू येथे पोहोचले आणि अर्शदला त्याच्या घरी भेटले. येथे भालाफेकपटू स्टार आणि त्याच्या कुटुंबियांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्‍यांनी अर्शद आणि त्याची आई रजिया परवीन यांना शुभेच्छा दिल्या.


ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णयश मिळवल्याबद्दल त्यांनी अर्शदला १० कोटींचा चेक सुपूर्द केला. सोबतच होंडा सिविक कारही दिली. याचे स्पेशल रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. या कारचा नंबर ९२.९७ इतका आहे.



कोचलाही दिला ५० लाखांचा चेक


याशिवाय मुख्यमंत्र्‍यांनी अर्शद यांचे कोच सलमान इकबाल बट यांना ५० लाख रूपयांचा चेक दिला. तसेच अर्शदला दिलेल्या ट्रेनिंगबद्दल त्यांनी कौतुक केले.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची