Bihar: जहानाबाद येथील सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू, श्रावण सोमवारनिमित्त झाली होती गर्दी

पाटणा: बिहारच्या जहानाबाद-मखदुमपूर येथील सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.


श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण जमले होते. मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी आले होते. यावेळी प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये धक्काबुक्कीमुळे रेलिंग तुटली आणि हा अपघात झाला.


चेंगराचेंगरी झाल्याची सूचना मिळताच ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.


याआधी २ जुलैला उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२० जणांचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी बाबा नारायण हरी यांच्या कार्यक्रमादरम्यान झाली होती.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या