Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीRaigad News : रायगडमध्ये लंपीचे थैमान! ७० ते ८० जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव

Raigad News : रायगडमध्ये लंपीचे थैमान! ७० ते ८० जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

खालापूर : गत वर्षी संपूर्ण राज्यात ‘लंपी’ (Lumpy Disease) या जनावरांच्या रोगाने थैमान घातले होते. त्यामुळे पशू संवर्धन विभाग (Animal Husbandry Department) महाराष्ट्र शासन यांनी उपाययोजना करून राज्यभरात लंपी प्रतिरोधक लसीकरण करून याचा बंदोबस्त केला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा लंपी आजाराने डोके वर काढले आहे. रायगडमध्ये (Raigad) लंपी आजाराने थैमान घातले आहे. अनेक जनावरांना या रोगाने ग्रासले आहे. परंतु या प्रकरणाबाबत प्रशासनकडून गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी येथे जवळपास ८० ते ९० कुटुंबं वास्तव्यास आहेत. येथील आदिवासी समाजाची उपजीविका या पशुधनावर आधारित आहे. अंदाजे ३०० ते ४०० पशुधन सद्यस्थितीत ठाकूरवाडी येथे आहे. परंतु आतापर्यंत याठिकाणी जवळपास ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली. तर काही जनावरे मरण पावल्यामुळे येथील आदिवासी आपले पशुधन कसे वाचेल या चिंतेत पडले आहेत.

दरम्यान, लंपीचे वाढते प्रकरण पाहता प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत स्थानिकांनी संबंधित विभागाशी संपर्क केला असता, ‘आम्ही खाजगी माणूस पाठवतो. त्यांच्याकडून लसीकरण करून घ्या आणि त्यांना लसीकरणचे पैसे द्या’ असे सांगितले जाते. पण प्रशासकीय यंत्रणा असूनही खाजगी डॉक्टरांकडून लसीकरण करून का घ्यावे? असा प्रश्न येथील आदिवासी बांधव यांना पडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -