मुंबई: भारतात जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की एक देश असाही आहे जिथे भारतातील १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि येथे भारतीय करन्सी १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे.
कोणता देश
भारतीयांना हे ऐकायला मजा येईल की त्यांचे १०० रूपये म्हणजे २००० रूपयांइतके आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पर्यटनस्थळाबद्दल सांगत आहोत जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक असते. इंडोनेशियामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. मिळालेल्या माहितीनुसार जुलै २०२४पर्यं इंडोनेशियामध्ये १ भारतीय रूपया साधारण १८९.५६ इंडोनेशियाई रूपयांच्या बरोबर आहे. भारताचे १०० रूपये येथील १९०० रूपयांच्या आसपास आहेत.
निशुल्क व्हिसा
याशिवाय इंडोनेशिया भारतीयांच्या आगमनासाठी निशुल्क व्हिसा देतात. त्यामुळे येथील प्रवास सुखकर आणि आनंदी होतो. येथे भारतीय लोक व्यापारही करतात. इंडोनेशियामध्ये राजकीय अस्थिरता अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम इंडोनेशियाई रूपयावर भारी पडत आहे. याच कारणामुळे येथे भारतीय रूपया नेहमीच मजबूत राहतो.
टूरिस्ट प्लेस
इंडोनेशिया भारतीयांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे सुट्टी घालवण्यासाठी आणि सैर सपाटा करण्यासाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे जगभरातील पर्यटक येतात. येथे रूपया मजबूत असल्याने तेथे राहण्यासाठी भारतीयांना अधिक किफायतशीर होते.