कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur) काल रात्री साडेआठच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा आणि राजर्षी शाहू महाराज यांची आठवण जपणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Natyagruha Fire) भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण नाट्यगृहासह खासबाग मैदानाला देखील मोठा फटका बसला. हे नाट्यगृह जळून खाक झाल्यामुळे नाट्यसृष्टीतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) यांनी हे नाट्यगृह पुन्हा नव्याने उभारणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हसन मुश्रीफ यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील नाट्यगृह पुर्नबांधणीच्या मदतीसाठी सरसावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केशवराव नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आता राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळावरील परिस्थिती तसेच वस्तुस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार नाट्यगृहाचे अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे केशवराव नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.