Saturday, May 10, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Almomds Vs walnuts: अक्रोड की बदाम? कोणते ड्रायफ्रुट आहे अधिक फायदेशीर

Almomds Vs walnuts: अक्रोड की बदाम? कोणते ड्रायफ्रुट आहे अधिक फायदेशीर

मुंबई: ड्रायफ्रुट्स हा पोषणतत्वांचा खजाना मानला जातो. काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड खाण्यासाठी जितके स्वादिष्ट असतात तितकेच फायदेशीरही असतात. अनेकदा म्हटले जाते की बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढते. दोन्ही सुकामेव्यामध्ये मानसिक आरोग्यासह शारिरीक विकासाला फायदेशीर ठरणारे घटक आहेत. दरम्यान, अनेकदा लोकांच्या मनात हा सवाल येतो की अक्रोड की बदाम यापेक्षा अधिक फायदेशीर काय आहे.



अक्रोडचे फायदे


हे ड्रायफ्रुट मेंदूच्या आकाराचे असते. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली होती. यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मँगनीज, कॉपर, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे आहेत. यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. अस्थमा रोखणयासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच शरीरासाठी फायदेशीर असते.



बदामाचे फायदे


रात्री बदाम भिजत घालून सकाळी साले काढून खाल्ल्यास त्याचे शरीरास अनेक फायदे मिळतात. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. यात प्रोटीन, फॅट, व्हिटामिन आणि मिनरल्स आढळतात. यामुळे शरीराला आजारापासून दूर रोखता येते. बदामामध्ये कॅल्शियम, व्हिटामिनई, बी६, थायमिन, फोलेट आणि पेन्टोथेनिक अॅसिड पुरेशा प्रमाणात असते. यात मँगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, फॉस्फरस, झिंक आणि पोटॅशियमसारखी तत्वे आढळतात. हे खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.



अक्रोड की बदाम?


मेंदूबाबत बोलायचे झाल्यास तसेच निरोगी राहण्यासाठी तज्ञांच्या मते अक्रोड आणि बदाम दोन्ही फायदेशीर आहेत. बदाम त्या लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे ज्यांना वजन कमी करायचे आहे. मेंदूसाठी अक्रोड थोडे जास्त फायदेशीर आहे. दररोज ४-५ बदामासह २ अक्रोड खाल्ल्याने शरीरास चांगले फायदे मिळतात.

Comments
Add Comment