Ganeshotsav Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! गणरायाच्या आगमनासाठी कोकणात धावणार आणखी रेल्वे

मध्य रेल्वेचा निर्णय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरू


मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही दिवस शिल्लक असताना अनेक ठिकाणी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात (Konkan) जातात. यासाठी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्याआधीच गाड्यांचे बुकिंग करण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. मात्र अनेकवेळ रांगेत उभे राहूनही अनेकांना आरक्षण मिळत नाही, यासाठी दरवर्षी मध्यरेल्वेकडून (Central Railway) विशेष गाड्या सोडण्यात येतात. यंदाही मध्य रेल्वेने २०२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता आणखी काही रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मध्य व पश्चिम रेल्वेने आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी द्वी (०१०३१) साप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्यांचा समावेश असणार आहे. तर पनवेल-रत्नागिरी (०१४४३-०१४४४) साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या, पुणे - रत्नागिरी (०१४४७-०१४४८) साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या, पनवेल रत्नागिरी (०१४४१-०१४४२) साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या आणि पुणे - रत्नागिरी (०१४४५) साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.


दरम्यान, या गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण उद्यापासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या