Jalna Accident : जालन्यात बसची ट्रकला जोरधार धडक! अपघातात १७ जण जखमी

  70

सिंदखेडराजाहून नाशिकला जात होती बस


जालना : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच आता जालन्याच्याजवळ (Jalna Accident) असणाऱ्या सिंदखेड राजा चौकात मोठा अपघात झाला आहे. एका सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात १७ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यापासून जवळच असणाऱ्या सिंदखेडराजाहून नाशिकला जाणाऱ्या बससमोर सायकलचालक येत असल्याचे दिसताच बसचालकाने त्याला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. यामुळे बस उलटी फिरत मागे असणाऱ्या ट्रकला आदळली. या अपघातामुळे हादरा बसल्याने १७ जण जखमी झाले. यात वृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.


या अपघातामुळे बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सिंदखेड राजा चौकात झालेल्या अपघातानंतर बसमधील प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून बसला हलवण्यात आले.

Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता