Nitin Gadkari : रस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने सुरु केले 'पायलट प्रोजेक्ट'!

नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा; नेमकी काय आहे ही योजना?


मुंबई : देशभरात सातत्याने छोटे मोठे अपघात घडत असतात. त्यातच सध्या पावसाळ्यात रस्ते अपघात (Road Accident) होण्याची शक्यता जास्त असते. मात्र अनेकदा अपघातामध्ये वेळीच उपचार व मदत न मिळाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत जाते. हे प्रकरण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार (Central Government) अपघातग्रस्त पीडितांच्या मदतीसाठी सज्ज झाले असून एक योजना सुरु केली आहे. त्या योजनेदरम्यान पीडितांना उपचारादरम्यान कॅशलेस ट्रीटमेंट (Cashless Treatment Plan) देण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. केंद्र सरकारने रस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पॉलिसी तयार केली आहे. 'पायलट प्रोजेक्ट' (Pilot Project) असे या पॉलिसीचे नाव असून याद्वारे अपघातग्रस्तांना, जखमी झालेल्या प्रवाशांना कॅशलेस ट्रीटमेंट देण्याचा प्लान तयार करण्यात आला आहे. तसेच सर्वप्रथम या पायलट प्रोजेक्टचं चंदीगढ आणि आसाममध्ये ट्रायल सुरु करण्यात येणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.



काय आहे योजनेचा फायदा?


या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांवर भारत पंतप्रधान जन आरोग्य अंतर्गत लिस्टेड रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. तसेच अपघात झाल्याच्या तारखेपासून पुढे सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा केयरसंबंधी आरोग्य लाभाचे पॅकेज दिले जाणार आहेत.



यांच्या समन्वयाने पार पडणार योजना


ही योजना आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयअंतर्गत एनएचए, स्थानिक पोलीस, लिस्टेड रुग्णालय, राज्य आरोग्य एजन्सी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केद्र आणि सामान्य विमा परिषदेच्या समन्वयाने पार पडणार आहे. तसेच याबाबत उत्पन्नाचे मार्ग आणि त्यावरील उपाय हे केंद्रीय मोटर वाहन नियम २०२२ अंतर्गत देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली :  दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने

निवडणुकीवर संकट?

आरक्षण मर्यादा प्रकरणी २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नवी दिल्ली : राज्यात सध्या सुरू