Manu Bhaker : मनू भाकरची हॅटट्रिक हुकली; पण भारतीयांची मने जिंकली!

  70

चौथ्या स्थानावर मानावे लागले समाधान


पॅरिस : सध्या सुरु असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून (Paris Olympic 2024) भारतीयांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. अवघ्या भारताचे लक्ष लागून राहिलेली खेळाडू मनू भाकरची (Manu Bhaker) ऑलिम्पिकमधील पदकांची हॅटट्रिक हुकली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूने दोन ऐतिहासिक कांस्यपदकांची कमाई केली. आज महिलांच्या २५ मीटर पिस्तुल फायनलमध्ये चौथ्या स्थानावर राहून पदकांची हॅटट्रिक गमावल्याने मनू भाकरसाठी हा संघर्षपूर्ण शेवट होता. तिला हंगेरीच्या वेरोनिका मेजरविरुद्ध शूटऑफमध्ये एका गुणाने पराभव पत्करावा लागला.


मनू भाकरने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात फायनलमध्ये जागा मिळवून आणखी एका पदकाची आशा जिवंत ठेवली. मनूने एकूण ५९० गुणांसह दुसरे स्थान गाठून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मनू भाकरने प्रिसीजनमध्ये ९७, ९८ आणि ९९ असा स्कोअर केला. यामध्ये तिचा एकूण स्कोअर २९४ होता. तर, रॅपिड फायरमध्ये १००, ९८ आणि ९८ स्कोअर करण्यात तिने यश मिळवले. यामध्ये तिचा एकूण स्कोअर २९६ झाला आणि मनू तिसऱ्यांदा फायनल खेळण्यासाठी पात्र ठरली.


मनुला या प्रकारातील अंतिम सामन्यात एकूण २८ गुणांसह चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. मनू मेडलपासून फक्त एका स्थानाने दूर राहिली. मनुने तिसरं स्थान पटकावलं असतं तर ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची हॅटट्रिक करत ब्रॉन्ज मेडल मिळवण्यात यशस्वी ठरली असती. मात्र मनुची संधी थोडक्यात हुकली. साऱ्या भारतीयांचं लक्ष हे मनुच्या कामगिरीकडे होतं. मात्र, मनुचं यासह पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्ठात आलं आहे.


दक्षिण कोरियाच्या जिइन यांगने सुवर्ण, फ्रान्सच्या कॅमिल जेद्रझेजेव्स्कीने रौप्य तर हंगेरीच्या वेरोनिका मेजरने तिसरे स्थान पटकावले. दोघींनीही ३७ गुणांची कमाई केली. वेरोनिका मेजरला पहिल्या दोघींच्या तुलनेत ६ गुण कमी मिळाले. वेरोनिकाने ३१ गुणांची कमाई केली, तर मनूला २८ गुण मिळाले.



कशी झाली असती हॅटट्रिक?


मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये १० मीटर एअर पिस्तूलच्या एकेरी प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. पॅरिसमध्ये पहिल्या कांस्यपदकासह मनूने पदकतालिकेत भारताचे खाते उघडले. त्यानंतर पार पडलेल्या १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात मनू भाकर व सरबजोत सिंह (Sarabjot Singh) या नेमबाजांच्या जोडीने भारताला आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. त्यानंतर आज तिने २५ मीटर पिस्तूल इवेंट प्रकारात फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे भारताला आणि स्वत: मनुला आज सलग तिसऱ्या पदकाची आशा होती, मात्र तिची संधी हुकली आहे.

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या