Paris Olympic: पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान भारतासाठी वाईट बातमी

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान भारतासाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारताची महिला गोल्फर दीक्षा डागर हिचा कार अपघात झाला आहे. या अपघातात दीक्षाला दुखापत झाली नाही मात्र तिची आई जखमी झाली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार दीक्षा डागरचा कार अपघात ३० जुलैला संध्याकाळी पॅरिसमध्ये झाला आहे. त्यात तिची आई जखमी झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला पाठीला दुखापत झाली आहे. दीक्षा ठीक असून ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या सामन्यात खेळेल.


अपघातावेळेस कारमध्ये कुटुंबातील ४ सदस्य होते. या अपघातात दीक्षाच्या आईला पाठीला दुखापत झाली तर भावाला किरकोळ दुखापत झाली. तर वडील आणि दीक्षाला कोणतीही दुखापत झाली नाही. तिची आई रुग्णालयात आहे.


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला गोल्फ इव्हेंट ७ ते १० ऑगस्टदरम्यान होणार आहे. या दरम्यान दीक्षाचा सामना ७ ऑगस्टला होणार आहे. भारताकडून महिला गोल्फ इव्हेंटमध्ये दीक्षाशिवाय आदिती अशोकही भाग घेत आहेत.

Comments
Add Comment

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या