पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत. दोन्ही पदके ही नेमबाजीत मिळाली आहेत. भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करत आहेत. भारताला दोन्ही पदके जिंकून देण्यात महिला नेमबाज मनू भाकर हिचे महत्त्वाचे योगदान ठरले.
पहिले पदक मनूने १० मीटर एअर पिस्टोल एकेरीमध्ये जिंकले होते. त्यानंतर भारताला दुसरे पदर १० मीटर एअर पिस्टोल मिश्रमध्ये मिळवून दिले. यात मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांनी पदक जिंकले. दुसरे पदक ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी आले. आज पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते.
पाचव्या दिवशी हे पदक नेमबाजीत मिळू शकते. महिलांची जोडी हे पदक भारताला मिळवून देऊ शकते. आज भारताला राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंह यांची जोडी पदक मिळवून देऊ शकते. जर दोघांच्या जोडीने नेमबाजीत महिला ट्रॅप फायनलसाठी क्वालिफाय केले तर पदक मिळण्याच्या आशा वाढतात.
याशिवाय इतर भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये अॅक्शनमध्ये दिसतील. जसे तिरंदाजी, बॅडमिंटन, रोईंग, बॉक्सिंग इत्यादींमध्ये पीव्ही सिंधू, लवलीना बोरगोहेन आणि लक्ष्य सेनसारखे अनेक स्टार्स मैदानावर उतरतील.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…