मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकलबाबत (Mumbai Local) मुंबईकरांना काही दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) रुळावर पाणी साचल्यामुळे, ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवेला फटका बसतो. या कारणांमुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशातच आजही सकाळी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे लोकलसेवा विलंबित झाल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्यामुळे सततच्या रेल्वेबाबत सततच्या होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, सध्या रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…