पॅरिस : भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी आनंदाची बातमी आली. बॅडमिंटनमद्ये चिराग आणि सात्विकच्या जोडीने क्वार्टर फायनलमध्ये पोहोचत इतिहास रचला. तर टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने ऑलिम्पिक टेबल टेनिस इव्हेंटमध्ये अंतिम ३२मध्ये फ्रान्सच्या १२व्या सीडेड प्रिथीका पवाडेला सरळ गेम्समध्ये हरवले.
कॉमनवेल्थ गेम्सची चॅम्पियन आणि १८वी सीडेड मनिकाने ३७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात ११-९, ११-६, ११-९, ११-७ असे हरवले. तर ऑलिम्पिक टेबल टेनिसच्या अंतिम १६मध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
मनिकाला पहिल्या गेममध्ये विजय मिळवण्यास संघर्ष करावा लागला. शेवटचे तीन गुण मिळवत तिने हा सामना ११-९ असा जिंकला. दुसऱ्यामध्ये ६-६ अशी बरोबरी असताना त्यानंतर मनिकाने प्रिथीकाला कोणतीच संधी दिली नाही.
तिसऱ्या गेममध्ये हीच लय कायम राखत मनिकाने ५ अंकांची सरशी घेतली मात्र प्रिथिकाने ९-१० असा स्कोर केला. मात्र प्रिथीका दबावात आली आणि तिने हा गेम गमावला. चौथ्या गेममध्ये मनिकाने ६-२ अशी आघाडी घेत चांगली सुरूवात केली. नंतर ही आघाडी १०-४ अशी वाढवली. मात्र हा ही गेम तिने जिंकला.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…