Nitesh Rane : संजय राऊत आणि त्याच्या मालकाच्या अकलेची किव येते!

  287

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतसह उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : काल मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पाचे देशभराच्या कानाकोपऱ्यातून कौतूक होत असताना संजय राजाराम राऊत (Sanjay raut) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचे म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्प समजण्याची कुवत आहे का, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.


आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात 'मला बजेट मधलं काही येत नाही, गरीबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला श्रीमंत करणारा बजेट ' अशी प्रतिक्रिया देशातील दिग्गज मंत्री आणि उद्योजकांसमोर दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेसारख्या ढ मालकासोबत त्याचा कामगार म्हणजेच संजय राऊत यांच्या अकलेची किव येते. त्यांनी अर्थसंकल्पाबाबत काहीच न बोललेलं बरं असे नितेश राणे यांनी म्हटले.


त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर काढलेले पुस्तक संजय राऊत आणि त्याच्या मालकाने वेळ काढून वाचा. त्या पुस्तकात अर्थसंकल्प कशाला म्हणतात, त्यात काय मांडलं जात हे समजून तुमचं तुमचं तोंड अर्थसंकल्प विषयावर उघडा, अशी बोचरी टीका त्यांनी केली.



संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना नितेश राणे यांचे खुले आव्हान


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अर्थसंकल्पाचे मुद्दे ऐकून नोंदवत असताना त्यांचा एक फोटो प्रकाशित झाला होता. त्या फोटोवर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्प समजण्याची कुवत आहे का, असा प्रश्न केला होता. त्यावर आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर केले की, मुंबईत एखादा हॉल घेऊन त्यामध्ये व्यासपीठावर बसलेले देवेंद्र साहेब आणि त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बसून कालचा झालेला बजेट आणि अर्थसंकल्प बाबत तुम्हाला काय कळलं हे मांडावं. हिंमत असेल तर आणि राजाराम राऊत यांचा पुत्र असल्यास हे आव्हान स्वीकार, असा इशारा नितेश राणे यांनी यावेळी दिला.



दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसण्याचे संजय राऊत यांचे काम


सकाळच्या परिषदेत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या मनात फडणवीस साहेब नाहीत असा विषय काढला होता. त्यावर संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसण्याचं काम चांगलचं जमतं असे म्हटले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या मनात काय आहे यांची चिंता सोडून उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मनात मुख्यमंत्र्यांची जागा आदित्य ठाकरे की रश्मी ठाकरे हे विचारुन नक्की कर व त्यानंतर अमित शहा यांच्या मनात कोण आहे त्याचा शोध घे, असेही नितेश राणे यांनी डिवचले.



आचार्य महाविद्यालयाने घेतलेला निर्णय योग्यच


चेंबूरमधील आचार्य कॉलेजने हिजाबबंदी बाबत घेतलेल्या निर्णयावर अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडले. यावर नितेश राणे यांनी म्हटले की, शाळेसह महाविद्यालयातही मुस्लिम समाज आणण्याचा हेतू आहे. हिंदु मुला-मुलींना लागू होणारे नियम मुस्लिम धर्मातील मुलांनीही पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धर्म आणि शिक्षण यातील कोणती गोष्ट महत्त्वाची वाटते ते लक्षात घेऊन तुमचा निर्णय घ्या, असे नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना