Hit and run case : मुंबई आणि पुण्यात 'हिट अँड रन'चा थरार!


मुंबई : गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत असलेल्या अपघाताच्या घटना (Accident news) ही चिंताजनक बाब आहे. त्यातच 'हिट अँड रन'च्या घटनांनी (Hit and run cases) तर राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. पुणे आणि वरळी 'हिट अँड रन' प्रकरण शांत होत नाही तोच राज्यात आज पुन्हा दोन 'हिट अँड रन'च्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईच्या मुलुंडमध्ये (Mulund) एका ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरून फरार झाला. तर दुसरीकडे पुण्याच्या पिंपरीमध्ये भरधाव कारने वृद्ध महिलेला उडवलं आहे. या घटनेतील चारचाकी वाहन चालक फरार आहे.





मुलुंडमध्ये नेमकं काय घडलं?





मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये आज सकाळच्या सुमारास एका ऑडी कारने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही रिक्षाचे चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर आहे. चौघांवर देखील सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ऑडी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघतामध्ये दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. जखमी प्रवाशांना आणि रिक्षा चालकाला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मुलुंड पोलिसांनी वाहनं ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.





पिंपरीत काय घडलं?





पिंपरी गावात काल २१ जुलै रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान हिट अँड रनची घटना घडली. पिंपरी गावातील नानेकर चाळजवळ एका चारचाकी वाहन चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक देऊन पळ काढला. अपघातानंतर पिंपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. चारचाकी वाहनाने वृद्ध महिलेला उडवल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.





या अपघातामध्ये महिलेला जोरदार मुका मार लागला. तिला उपचारानंतर डॉक्टरांनी घरी जाण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र, महिलेला धडक देणारा चारचाकी वाहन चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला. या चालकाविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल असून ते त्याचा शोध घेत आहेत.


Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई