मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आपल्या पुढील मिशनसाठी श्रीलंकेला पोहोचली आहे. संघासोबतच नवे कोच गौतम गंभीरही सोबत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचा पहिलाच दौरा आहे.
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ टी-२० सामन्यांची मालिका आणि ३ वनडे सामन्यांची खेळणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचल्यावर अनेक फोटो तसेच व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दौऱ्याची सुरूवात २७ जुलैला होत आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना २७ जुलैला होईल. टी-२० मालिका पल्लेकलमध्ये होत आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल. दोन्ही संघादरम्यानचा पहिला वनडे सामना २ ऑगस्टला होईल. यानंतर शेवटचा वनडे सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल. यानंतर हा दौरा संपून जाईल.
श्रीलंका दौऱ्यात टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आले आहे. तर वनडेची कमान वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माच्या हाती आहे.
२७ जुलै पहिला टी-२० सामना, पल्लेकल
२८ जुलै दुसरा टी-२० सामना, पल्लेकल
३० जुलै तिसरा टी-२० सामना, पल्लेकल
२ ऑगस्ट पहिला वनडे सामना, कोलंबो
४ ऑगस्ट दुसरा वनडे सामना, कोलंबो
७ ऑगस्ट तिसरा वनडे सामना कोलंबो
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…