Heart Attack Video : झुम्बा करत असतानाच तरुणाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू


मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका झुम्बा क्लासमध्ये झुम्बा करत असताना एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ५ ते ५ जण क्लासमध्ये झुम्बा करत आहे. मागच्या रांगेत असलेला तरुणाला अचानक चक्कर सारखे जाणवते. तो खांबाचा आधार घेत उभा रहाण्याचा प्रयत्न करत असतानाच तो अचानक जमिनीवर कोसळतो. त्याच्या मित्रांनी पाहीले आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर कोसळताच, त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर क्लासमध्ये एकच खळबळ उडाली.






https://twitter.com/parmoddhukiya/status/1815058664589570209?ref_src=




कोरोना महामारीनंतर तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वीच्या काळी साठीनंतरच्या लोकांना याचा धोका जाणवायचा. परंतु गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा धोका जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. दारू आणि सिगारेट हेच कारण याला जबाबदार नाहीत तर वैज्ञानिकानुसार, प्रमाणापेक्षा अधिक वजन वाढल्याने, गरजेपेक्षा अधिकचा व्यायाम केल्याने, दैनंदिन आहारातील बदल आणि जंक फूड, फास्ट फूड, अशी अनेक कारणे समोर येत आहेत.






amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">justin vicky death: २१० किलो वजन उचलण्याच्या प्रयत्न करत होता, मानच मोडली!

बाली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियामधील ३३ वर्षीय फिटनेस इन्फ्लुअन्सर जस्टिन विकी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये २१० किलो वजनाचा बारबेल उचलत ...



Comments
Add Comment

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या

Baba Aadhav | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती

'इंडिगो'वर कारवाई होणारच; मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

रुद्राणी घोडी १ कोटी १७ लाख रुपयांत

नंदुरबार : नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या