Guru purnima : गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांविषयी नारायण राणे यांची खास पोस्ट!





मुंबई : गुरुपौर्णिमा (Guru purnima) म्हणजे गुरुला वंदन करण्याचा दिवस. या दिवशी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लाभलेल्या गुरुला वंदन करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. लोकसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त एक खास पोस्ट शेअर करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. २००५ मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि ते भाजपात सामील झाले. मात्र, त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी आदर आणि मनात गुरुचे स्थान कायम असल्याचं त्यांच्या पोस्टमधून व्यक्त झालं आहे.



नारायण राणे यांनी एक्स अकाऊंटवर खास पोस्ट केली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला त्यांचा जुना फोटो ट्वीट केला आहे. यासह त्यांनी पोस्टमध्ये "गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. #SriGuruPurnima", असं लिहिलं आहे. नारायण राणे यांनी शिवसेना पक्षातून राजकारणातील कारकि‍र्दीला सुरुवात केली. नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारणाचे धडे घेतले, ते त्यांचे गुरु. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या नारायण राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडली.






गेल्या दोन वर्षांत शिवसेना पक्षांतर्गत अनेक घडामोडी झाल्या. शिवसेनेचे दोन भाग होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन शिवसेना तयार झाल्या. हे दोन्ही गट बाळासाहेबांच्या विचारावर पक्ष चालत असल्याचा दावा करतात. या उलथापालथींमुळे राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच बाळासाहेबांप्रती असलेला आदर मात्र कमी झालेला नाही. नारायण राणे यांनीदेखील भाजपमध्ये गेल्यानंतरही बाळासाहेबांना आपलं गुरु कायम मानलं आहे.


Comments
Add Comment

बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात