Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी!

Share

मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजाच्या संघर्षामुळे (Maratha Vs OBC) राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे भाजपा नेते आणि मनोज जरांगे यांच्यात सतत वाद प्रतिवाद सुरु असल्याचं चित्र आहे. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीदेखील जरांगेंचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलंय जातंय’, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते पुणे येथील भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मी त्यावेळी मंत्री होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सलग २० रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणायचो, की तब्येतीची काळजी घ्या. शेवटी त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला. विधीमंडळात तो एकमताने मंजूर करण्यात आला. हायकोर्टाने देखील या कायद्याला मंजूरी दिली. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आणि कमजोर आहे, त्यामागचा भाग सुप्रीम कोर्टात मांडला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांनी जर सुप्रीम कोर्टात ४ चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते, तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायमचाच सुटला असता. पण असं झालं नाही. त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलं जातंय. काहींच्या तोंडातून राजकीय वास येतोय”, अशी टीकाही बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता केली.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

35 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

2 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago