SBI Recruitment : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! 'या' बँकेत १०००हून अधिक पदांची मेगाभरती

मुंबई : सध्या अनेकजण सरकारी बँकेत (Government Bank Job) नोकरीची करण्याची संधी शोधत असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) रिक्त पदे भरण्यासाठी भरती जारी केली आहे. पदांसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांना ८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जाणून घ्या या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, निवड पद्धत, अर्ज फी आणि अर्ज करण्याची पद्धत.


एसबीआयने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत एकूण १०४० रिक्त पदे भरण्यासाठी बँकेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यामध्ये प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिजनल ऑफिसर, रिलेशनशिप मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट ऑफिसर यासह अनेक वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. या पदांमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवार अर्ज्र समाप्तीच्या तारखेपर्यंत एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.



असा करा अर्ज



  • SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या

  • होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबवर क्लिक करा.

  • आता SCO Recruitment 2024 च्या लिंकवर क्लिक करा.

  • सूचना वाचा आणि नियमानुसार अर्ज करा.


अर्ज फी


सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील अर्जदारांना ७५० रुपये शुल्क जमा करावे लागेल. तर SC, ST आणि PWBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.



शैक्षणिक पात्रता


प्रादेशिक अधिकारी आणि रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर अनेक पदांसाठी एमबीएची पदवी मागविण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवाराला संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.



निवड पद्धत


मुलाखतीद्वारे तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारावर अर्जदारांची निवड केली जाईल. तसेच ही निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतसह सीटीसी वाटाघाटींवर आधारित असणार आहे.

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय