Manorama Khedkar : मनोरमा खेडकरांची कार पोलिसांनी केली जप्त!

  107

शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी जाताना वापरली होती कार


पुणे : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) वादग्रस्त पद्धतीने चर्चेत आल्या आहेत. त्यांचे अनेक कारनामे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत, त्यातच त्यांची आई मनोरमा खेडकरलाही (Manorama Khedkar) अटक झाली आहे. काही दिवसांपूर्वी हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल (Video viral) झाला होता. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली. तर आता पुढील कारवाई करत या व्हिडीओमध्ये दिसलेली मनोरमा खेडकरांची कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे खेडकरांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.


पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली. दरम्यान, यावेळी त्यांनी ज्या टोयोटा कारचा उपयोग केला होता, ती कार पोलिसांनी जप्त केली आहे.



पूजा खेडकर दिल्लीला रवाना?


तर दुसरीकडे, क्राइम ब्रान्चने (Crime branch) गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकरने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिल्ली क्राईम ब्रांचकडे पूजा खेडकरच्या दिल्लीवारीची कोणतीही माहिती नाही. तसेच दिल्ली क्राइम ब्राँचने खेडकर यांना बोलावण्याविषयीच्या वृत्ताला त्यांनी फेटाळून लावले आहे.



मनोरमा खेडकरांच्या अडचणी वाढल्या


मनोरमा खेडकरला अखेर गुरुवारी सकाळी महाड येथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेसह पौड पोलिसांनी ही कारवाई केली. पिस्तुल रोखून एका शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप मनोरमावर होता. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यामध्ये खेडकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाली होती. मनोरमा खेडकरला ज्या होम स्टे (हॉटेल) मधून पकडण्यात आले, तेथे नाव बदलून ती राहत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.


Comments
Add Comment

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओएसडीने घेतली मनोज जरांगेंची भेट, मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग