अलमायटीचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Share

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा

वाडा : वाडा तालुक्यातील घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या हद्दीत अलमायटी ऑटो कंपनी असून या कंपनीने शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून अनधिकृत बांधकाम केले आहे. हे बांधकाम निष्कासित करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे.

घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या हद्दीत ‘अलमायटी ऑटो अल्सिनरी’ ही कंपनी आहे. या कंपनीत चारचाकी गाड्यांचे वायफर व त्यासाठी लागणाऱ्या यंत्राचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीने औद्योगिक बांधकाम करताना शासनाचे नियम व अटींकडे पूर्णता दुर्लक्ष केले आहे. कंपनीने औद्योगिक वाढीव बांधकाम करताना नियमानुसार जमीन औद्योगिक बिनशेती करणे, बांधकाम परवानगी घेणे मंजूर नकाशाप्रमाणे नियम व अटींच्या अधीन राहून काम करणे तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक २०१५. १९ ऑक्टोबर २०२० अन्वये ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी अथवा विस्तार करण्यासाठी ग्रामपंचायतकडून ना-हरकत दाखला घेणे आदी बाबी बंधनकारक असतानाही त्यांनी सदरील नियम व अटींचे पालन न करता अनधिकृत वाढीव बांधकाम करून शासनाचा तसेच ग्रामपंचायतीचा कर बुडवून ग्रामपंचायतीची दिशाभूल करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप निवेदन तक्रारीत ग्रामस्थांनी केला आहे.

शासन निर्णयानुसार औद्योगिक बांधकाम करताना काही टक्के एफआयएस सोडणे बंधनकारक आहे. कंपनीत रुंद रस्ते, पार्किंग, बगीचा यासाठी जागा सोडणे गरजेचे असतानाही कंपनीने रस्त्यावरच क्रेन उभी केली आहे. संपूर्ण कंपनीत रुंद रस्ते नाहीत, त्यामुळे दुदैवाने एखादा अपघात झाल्यास रुग्णवाहिका अग्निशमन दलाचा बंब जागेवर पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे कामगारांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीतीही तक्रारीत व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीनेही कंपनीचे बांधकाम निष्कासित करणेबाबतची संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असून तसा ठरावही ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे याबाबतची तक्रार ग्रामपंचायत घोणसई मेटने २३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी पालघर व सहाय्यक नगर रचना पालघर यांच्याकडे केली असून एवढा प्रदीर्घ काळावधी उलटूनही महसूल प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता याउलट कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीत केला आहे.

दरम्यान, अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश आपणांकडून संबंधित विभागाला द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तक्रारीत देण्यात आला आहे.

आमच्या कंपनीने बिनशेती (एन.ए.) केला असून सदरचे बांधकाम जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच केले आहे. सर्व काम नियमानुसार आहे, असे अलमायटी ऑटो अल्सिनरी कंपनीचे व्यवस्थापक, जयेश अमृतकर यांनी सांगितले.

सदर कंपनीचे बांधकाम हे अनधिकृत असून आमच्या कार्यालयाकडून असा कोणताच नकाशा मंजूर नाही. तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत, असे नगररचना पालघर विभागाचे सहाय्यक अधिकारी, प्रसाद देवरे यांनी म्हटले.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

7 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

7 hours ago