Saturday, August 31, 2024
Homeताज्या घडामोडीAanvi Kamdar : रीलने घेतला जीव! इन्स्टा इन्फ्लुएंसरचा खोल दरीत कोसळून मृत्यू

Aanvi Kamdar : रीलने घेतला जीव! इन्स्टा इन्फ्लुएंसरचा खोल दरीत कोसळून मृत्यू

उंच कड्यावरुन व्हिडीओ बनवताना तोल गेला आणि…

मुंबई : सोशल मीडिया (Social media) कितीही आकर्षित करत असलं तरी त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा याची मर्यादा आपणच घातली पाहिजे. हल्लीची तरुण पिढी मात्र सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. रील्स बनवून लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी तरुण ज्या थराला जाऊन स्टंटबाजी करतात, त्याने ते स्वतःचाच जीव धोक्यात घालत असतात. काही दिवसांपूर्वीच हा विषय चर्चेत आला होता व अशी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना शिक्षाही देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा एका फेमस इन्स्टा इन्फ्लुएंसरने (Insta Influencer) उंच कड्यावरुन रील बनवण्याचा प्रयत्न केला. तिचा तोल गेला आणि थेट ३०० फूट खोल दरीत कोसळून तिचा दुर्देवी मृत्यू झाला. अन्वी कामदार (Aanvi Kamdar) असं या तरुणीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग जवळील माणगाव तालुक्यातील कुंभे येथे ही घटना घडली. अन्वी तिच्या काही सहकाऱ्यांसोबत मुंबईहून माणगावमधील कुंभे येथे पर्यटनासाठी (tourism) आली होती. मात्र दरीच्या एका कड्यावर रील बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि ती तब्बल ३०० फूट दरीत कोसळली. ही तरुणी २७ वर्षांची होती.

दरम्यान अन्वीच्या सहकाऱ्यांनी ही माहिती तात्काळ माणगाव पोलिसांना दिली. सर्व माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दरी अतिशय खोल असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. बचाव कार्यास मदत करण्यासाठी पोलिसांनी कोलाड तसेच माणगाव आणि महाड येथून अधिकचे प्रशिक्षक बचाव पथकास बोलावले. सर्वांच्या सहकार्याने अन्वीला जखमी अवस्थेत स्ट्रेचरच्या साहाय्याने वर आणण्यात आले. त्यानंतर अन्वीला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

कोण आहे अन्वी?

दरीत पडून दुर्देवी मृत्यू झालेली अन्वी मुंबई येथे वास्तव्यास होती. पावसाळ्यात पर्यटनासाठी ती आपल्या मित्रांसोबत माणगाव येथील कुंभे धबधब्याजवळ आली होती. अन्वी एक लोकप्रिय सोशल मीडिया रिल स्टार होती शिवाय ती व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असल्याचीही माहिती समोर येत होती. मात्र तरुण वयात दुर्देवी मृत्यू झाल्याने अन्वीच्या कुटुंबियावर दुखांचा डोंगर कोसळला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -