सोलापूर : काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेची घोषणा केली. यामध्ये राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा होणार आहेत. यामुळे महिला वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु पुरुष वर्गाने यादरम्यान नाराजीचा सूर मारला होता. सातत्याने लाडका भाऊ योजना का नाही? असा प्रश्न पुरुष वर्गाकडून केला जात होता. ही गोष्ट लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तरुणवर्गासाठी एक आनंदाची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) विठुरायाची (Vitthal) महापूजा करण्यासाठी पंढरपूरला (Pandharpur) हजेरी लावली होती. पूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी-समाधानी होऊ दे, असे मागणे विठुरायाकडे मागितले. त्यानंतर त्यांनी राज्यात आपण लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली असून याचा लाभ लाखो महिलांना मिळत असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. तर आता आपण लाडक्या भावालाही (Ladka Bhau Yojna) आर्थिक मदत देणार आहोत. यामुळे आता बहिणींसोबत भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
असे म्हटले.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत, राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. यात तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
त्यासोबत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे राज्य सरकार पैसे भरेल अशी माहितीही देण्यात आली आहे. अशा प्रकारची योजना आणण्याची इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देणार आहे.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…