मुंबई: भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या पहिल्या हंगामाचा खिताब जिंकला आहे. युवराज सिंगच्या नेतृत्वात इंडियन चॅम्पियन्सने १३ जुलैला एजबेस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सला ५ विकेटनी हरवले.
पाकिस्तानचा कर्णधार युनिस खानने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान १९,१ षटकांत पूर्ण केले. अंबाती रायडूने ३० बॉलमध्ये ५० धावा ठोकल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली. सलामी फलंदाज रॉबिन उथप्पा आणि रायडू यांनी पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच सामना केला. रायडूने पहिल्या ओव्हरमध्ये आमिर यामीनला चौकार-षटकार लगावत धमाकेदार सुरूवात केली.
पहिल्या विकेटसाठी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी ३४ धावांची भागीदारी केली. उथप्पा ८ बॉलमध्ये १० धावा करून परतला. त्यानंतर अंबाती रायडू आणि गुरकिरत सिंह मान यांनी काळी वेळ भागीदारी केली. १२व्या षटकांत इंडिया चॅम्पियन्सला तिसरा झटका बसला. रायडू ३० बॉलमध्ये ५० धावा करून बाद झाला.
त्यानंतर गुरकिरत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर संघाला पाचवा झटका १५० धावांवर बसला. येथे युसुफ पठाण बाद झाला. तो १९व्या षटकांत दुसऱ्या बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार युवराज सिंहने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी करत भारताला विजयपथावर आणले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान…
मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन…
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर…
मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र…
'वक्फ'वर उद्याही होणार सुनावणी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध बुधवारी सर्वोच्च न्यायालयात…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश भूषण गवई ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.विद्यमान…