Chandipura Virus : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसची एन्ट्री! सहा जणांना विषाणूची लागण, चौघांचा मृत्यू

गांधीनगर : पुण्यामध्ये (Pune) सध्या झिका व्हायरसने (Zika Virus) धुमाकूळ घातला असताना गुजरातमध्येही एका नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. कोरोना (Corona) व्हायरसनंतर गुजरातमध्ये 'चांदीपुरा' (Chandipura Virus) नावाच्या व्हायरसने एन्ट्री केली आहे. यामुळे दोन दिवसांत चौघांचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागही (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात चांदीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार चार मुलांना चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यासोबत आणखी दोन मुलांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या मुलांवर उपचार सुरु असून त्यांचे रक्ताचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागही सक्रिय झाला असून साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात नवीन व्हायरसबाबत सर्वेक्षण सुरू केलं आहे.


दरम्यान, हा व्हायरस रोखण्यासाठी आज आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होऊ शकते, असा दावा केला जात आहे. या बैठकीत चाचणीसह इतर योजनांबाबत निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



लक्षणे


'चांदीपुरा' व्हायरसची लागण झालेल्यांना ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) होते. त्यासोबत मेंदूला सूज येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू Rhabdoviridae कुटुंबातील वेसिक्युलोव्हायरस वंशाचा सदस्य आहे. जे डास, वाळू माशी आणि कीटकांद्वारे पसरते.



उपाय


या विषाणूपासून संरक्षण करण्याचे उपाय मलेरियापासून बचाव करण्यासारखे आहेत. जसे घरामध्ये आणि आजूबाजूला स्वच्छता राखणे, डास किंवा माश्या यांच्या संपर्कात येऊ नये आणि झोपताना मच्छरदानीचा वापर करणे.

Comments
Add Comment

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले

Viral 'brother-sister' : ३५ हजार फूट उंचीवरही राखीचं नातं; एअर इंडियाचे भाऊ-बहिण बनले सहकारी, कहाणी होतेय व्हायरल

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह