मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना हरारेमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात यशस्वी जायसवाल काही खास करू शकला नाही. त्याने ५ चेंडूंचा सामना करताना १२ धावा केल्या.
दरम्यान, या छोट्याशा खेळी दरम्यान यशस्वीने इतिहास रचला. यशस्वी असा पहिला फलंदाज ठरा आहे ज्याने एखाद्या टी-२० सामन्यातील पहिल्या लीगल बॉलवर १२ धावा केल्या.
खरंतर सिकंदर रजाच्या सामन्याच्या पहिल्या बॉलवर फुलटॉस टाकला. यावर यशस्वीने षटकार ठोकला. त्या बॉलवर अंपायरने नो बॉल करार दिला.
त्यानंतर फ्री हिटवर यशस्वीने पुन्हा षटकार ठोकला. म्हणजेच एका बॉलवर एकूण १३ धावा बनल्या. यात १२ धावा यशस्वीच्या खात्यात आल्या. दरम्यान, यशस्वी काही खास करू शकला नाही. त्याच ओव्हरमध्ये सिकंदर रजाने त्याला क्लीन बोल्ड केले.