महाराष्ट्र विधानपरिषदेची आज निवडणूक, ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात

Share

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या(Maharashtra Legislative Council election) ११ जागांसाठी निवडणुकीचे मैदान तयार आहे. या जागांसाठी आज निवडणूक होत आहे. राज्याचे विधानसभा सदस्य दक्षिण मुंबईच्या विधान भवन परिसरात एकत्र होतील.येथे सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. मतांची मोजणी संध्याकाळी ५ वाजता केली जाईल. निवडणुकीच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या केवळ तीन महिने आधी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. अशातच सर्व राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सर्वच पक्षांनी आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी विविध रणनीती आखल्या आहेत.

११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. यासोबतच भाजपचे सहकारी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून दोन सदस्य माजी लोकसभा सदस्य कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर एनसीपीने शिवाजीराव गरजे आणि राजेश वितेकर यांना तिकीट दिले आहे. राज्यात विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने ३ उमेदवार उतरवले आहेत.

उद्धव ठाकरेच्या गटाने १, काँग्रेसकडून १ उमेदवार तर शरद पवार गटाने उमेदवार न उतरवता भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे.

एका जागेसाठी किती मते गरजेची?

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. विधानसभेची सध्याची स्ट्रेंथ २७४ आहे. अशातच विधान परिषदेच्या एका जागेवर विजय मिळवण्यासाठी एकूण २३ मते मिळणे गरजेचे आहे.

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

11 minutes ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

1 hour ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

1 hour ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 hour ago