मुंबईत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर वरूण राजा पुन्हा एकदा मुंबईत जोरदार कोसळत आहे. पहाटेपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे.


जोरदार पावसामुळे अनेक रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने कामावर जाणाऱ्या लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.


रेल्वे उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या ठाणे, दादर, कल्याण तसेच कुर्ला या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. एक आठवड्याआधीच मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. या पावसात संपूर्ण रेल्वेची व्यवस्थाच कोलमडून गेली होती.


शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारपासून मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा –

मुंबई मेट्रो - ११ च्या प्रकल्पाच्या नवीन मार्गाची प्रक्रिया सुरू

मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल)

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी