Jio, Airtel आणि Viचे सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान्स, मिळणार एक वर्षाची व्हॅलिडिटी

मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये बदल केले आहेत. या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या सुरूवातीला आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमतीत २० ते २७ टक्के वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचा खर्च मात्र वाढला आहे.


जर तुम्ही या टेलिकॉम कंपन्यांची सर्व्हिस वापरता तर तुमचा महिन्याचा तसेच वर्षाचा रिचार्जचा खर्च आता वाढणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सने कॉलिंगपासून ते डेटा पर्यंतच्या प्लान्समध्ये बदल केले आहेत. जाणून घेऊया स्वस्त आणि महाग प्लानचे डिटेल्स...



जिओचा वार्षिक प्लान


जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वार्षिक प्लान्स आहेत. दरम्यान, आपण सामान्य प्लानबद्दल बोलूया. कंपनी ३५९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात युजर्सला ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.


कंपनी एक स्वस्त पर्यायही देते. तुम्ही १८९९ रूपयांचा प्लान खरेदी करू शकता. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएसची सुविधा मिळते.



Airtelचा ३६५ दिवसांचा प्लान


एअरटेलमध्ये ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिकची सुविधा मिळते.


कंपनी १९९९रूपयांचा वार्षिक प्लानही ऑफर करते. यात ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.



Viचा ३६५ दिवसांचा रिचार्ज


या पद्धतीने Viचा ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात युजर्सला ८५०जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय युजर्सला Binge All Night चाही अॅक्सेस मिळतो. जर तुम्ही स्वस्त प्लानच्या शोधात आहात तर कंपनी १९९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबत २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएस मिळतात. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना केवळ कॉलिंग हवे आहे.

Comments
Add Comment

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल