मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड भारतात ग्राहकांना चांगला प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. नुकत्याच खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपले प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना मोबाईल सिम आऊटगोईंग व्हॅलिडिटी अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र अशा वेळेस बीएसएनएललकडे १०७ रूपयांचा प्रीपेड प्लान आहे जो ग्राहकांना सर्व्हिस व्हॅलिडिटी आणि अनेक फायदे देत आहे. जाणून घेऊया याचे डिटेल्स
सगळ्यात आधी म्हणजे बीएसएनएचा १०७ रूपयांचा प्लान ३५ दिवसांच्या सर्व्हिस व्हॅलिडिटीसह येतो. आता हा ग्राहकांसाठी सरप्राईज प्लान आहे. असे यासाठी कारण इतर सर्व खासगी दूरसंचार ऑपरेटर ३० दिवसांपेक्षा कमी सर्व्हिस व्हॅलिडिटीसह आपले बेस प्रीपेड प्लान ऑफर करत आहेत.
बीएसएनएल या प्लानसह डेटा बेनेफिटही देत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी या प्लानसोबत ३ जीबी डेटा आणि २०० मिनिटांचा व्हॉईस कॉलिंग देत आहे. दरम्यान, विशेष म्हणजे बीएसएनएल या प्लानसोबत कोणतेही एसएमएसचे फायदे देत नाही आहे. यात ३५ दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून अॅक्सेस जरूर मिळेल. या प्लानला तुम्ही फोन पे अथवा गुगल पेच्या माध्यमातून खरेदी करू शकता.
हा एक असा प्रीपेड प्लान आहे जो जबरदस्त आहे. जर तुमच्याकडे सेकंडरी सिम आहे आणि त्याला तुम्हाला अॅक्टिव्ह ठेवायचे आहे तर तुमच्यासाठी हा प्लान चांगला ठरू शकतो. दरम्यान, बीएसएनएलकडे ४जी नाही हे ही तुम्हाला समजावे लागेल. त्यामुळे सर्व्हिस क्वालिटी आणि ओव्हरऑल एक्सपिरियंसमध्ये तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…