नवी दिल्ली : मद्य घोटाळ्याप्रकरणी (Liquor scam case) गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला आहे. त्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण त्यांच्या अटकेचं प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायाधीशांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश तीन न्यायाधीशांची नियुक्ती करतील. या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत.
केजरीवाल सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत, त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. अशा परिस्थितीत ते सध्या तुरुंगातच राहणार आहेत. अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की, सीबीआय प्रकरणी १८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…