Elvish Yadav : 'या' प्रकरणामुळे एल्विशच्या मागे पुन्हा ईडीचा फेरा!

मुंबई : यूट्यूबर (Youtuber) आणि बिग बॉस ओटीटी २ (Big Boss OTT 2) चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ ​एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी ​एल्विशने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाची नशा केल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यावेळी काही तासाच्या चौकशीनंतर त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. कोठडीकाळ पूर्ण झाल्यानंतर तो जामीनावर सुटून बाहेर आला होता. मात्र त्याच्यावरील हे संकट अद्यापही टळले नसल्याचे दिसून येत आहे. पार्टीत नशा म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याने ईडीने एल्विश यादवला पुन्हा फेरा मारला आहे. मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात ईडीने एल्विशला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ​​एल्विश यादवला मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे २३ जुलै रोजी एल्विशला चौकशीसाठी लखनऊला जावे लागणार आहे. यापूर्वी ईडीने ८ जुलै रोजी नोटीस बजावली होती. मात्र एल्विशने परदेशात असल्याचे कारण देऊन काही दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानंतर ईडीने १५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.


दरम्यान, चौकशी दरम्यान ईडी एल्विशच्या मालकीच्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबत मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसच्या मालकांचीही चौकशी करणार असल्याचे समजत आहे. रेव्ह पार्ट्यांसाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याचे अनेक आरोप एल्विशवर आहेत. त्यामुळे सध्या जामिनावर बाहेर असणाऱ्या एल्विशवर ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या