Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीAkola news : धक्कादायक! पगारवाढीचे आमिष देत तरुणीकडे केली शरीरसुखाची मागणी

Akola news : धक्कादायक! पगारवाढीचे आमिष देत तरुणीकडे केली शरीरसुखाची मागणी

जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांवर विनयभंगाचा गुन्हा 

अकोला : अकोल्यात काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या एका व्यक्तीने ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात एका २९ वर्षीय तरुणीकडे जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांनी पगारवाढीचे आमिष देत शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.  या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात ही घटना घडली. चक्क दोन अधिकाऱ्यांनी २९ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. एवढ्यावरच न थांबता तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप पीडीत तरुणीने केला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मुर्तिजापूर पोलिसांत दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात २९ वर्षीय तरुणी कंत्राटी कंम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. मागील महिन्यांपासून तिचा पगार थकीत आहे. त्यात पगरात वाढ व्हावी, म्हणून पीडित तरुणीने कार्यलयातील शाखा अभियंता डी.बी. कपिले यांच्याकडे पगार वाढीसाठी विनवणी केल्या. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद अधिकारी देत नव्हते.

अखेर दुय्यम अधिकारी आर इंगळे यांना ती भेटली असता आपण SDO नाहीये काही करू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. पगार काढण्यासाठी त्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच २० जून रोजी कपिले याने चेंबरमध्ये तरुणीला बोलवले असता तरुणी एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीने त्याला विरोध केला असता कामावरून काढून टाकण्याची धमकी अधिकारी देऊ लागला. अखेर तरुणीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. लागलीच कुटुंबीयांनी मुर्तिजापूर पोलीस स्टेशन गाठलं. तरुणीच्या तक्रारीवरून शाखा अभियंता डी.बी. कपिले आणि आर. इंगळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्यस्थित या प्रकरणी PSI अरुण मेश्राम अधिक तपास करतायत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -