Air Kerala : हवाई प्रवास होणार आणखी स्वस्त! लवकरच सुरु होणार 'ही' नवी विमानसेवा

मुंबई : भारतीय प्रवासी लवकरच कमी किमतीत हवाई प्रवास करु शकणार आहेत. दुबईमधील (Dubai) दोन व्यावसायिकांद्वारे नवी एअरलाइन (Airline) सुरु करण्यात आली आहे. सध्या परदेशात असणाऱ्या या विमानसेवेला सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर पुढील वर्षातच ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच भारतातही दाखल होणार असल्याचे कंपनीच्या संस्थापकांनी सांगितले. त्यामुळे हवाई प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर केरळ' (Air Kerala) असे नव्या विमानसेवेचे नाव असून या एअरलाइनच्या सुरुवातीला तीन एटीआर ७२- ६०० विमाने वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर ही एअरलाइन देशातील श्रेणी २ आणि श्रेणी ३ सारख्या छोट्या शहरांना जोडण्यात येणार आहे. सध्या जेटफ्लाय एव्हिएशन या नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला हवाई वाहतूक सेवा चालवण्यास ३ वर्षांची मान्यता देण्यात आली आहे, असे कंपनीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.



दोन उद्योगपतींचा पाठिंबा


एअर केरळ ही विमानसेवा भारताच्या दक्षिण भागातील पहिली प्रादेशिक विमानसेवा असणार आहे. केरळ सरकारने २००५ साली पहिल्यांदा या विमान कंपनीची योजना आखली होती. त्यानंतर तब्बल १९ वर्षानंतर ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी दुबईतील अफी अहमद आणि अयुब कल्लाडा या दोन मोठ्या उद्योगपतींचा पाठिंबा मिळाला आहे.



आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना


एअर केरळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. एअर केरळच्या ताफ्यात २० विमाने आल्यानंतर ही एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकते. सध्या ही सेवा दुबईमध्येच सुरु असणार असून नंतर इतर मार्गांवरही सुरू करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे