Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

  196

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना


मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे. काही ठिकाणी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य व हार्बर रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. त्यातच नवी मुंबईतून मुसळधार पावसामुळे एक दुर्दैवी गटना समोर आली आहे. पावसामुळे लोकल उशिराने धावत असल्याने कामावर वेळेत पोहोचण्यासाठी लोक जीवाची पर्वा न करता लोकल पकडत आहेत. अशा घाईतच एक महिला धावत्या रेल्वेमधून थेट रुळावर पडली, तिचा जीव वाचला मात्र गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळेल ती लोकल पकडून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. त्यातच सीबीडी बेलापूर स्टेशनजवळ एक महिला धावत्या ट्रेनमधून अचानक खाली पडली. पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनकडे येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. त्यामुळे महिलेच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डबा गेला. या घटनेत महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटल्याची माहिती आहे.


घटनेनंतर रेल्वेस्थानकात मोठा गोंधळ उडाला. प्रवाशांनी या घटनेची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. सध्या ही महिला गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर ओसरला असून लोकलसेवा पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनने प्रवास करताना घाईगडबड करू नये. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा तसेच उतरण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाचं काय होणार ? तोडगा निघणार की... ?

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.