Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज! प्रकृती स्थिर

घरी आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला


नवी दिल्ली : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात (AIMS Hospital) दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार वयासंबंधी तक्रारी वाढल्याने त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु पुन्हा प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री ९ वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. काल सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत.


लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या आठवड्यात २६ जून रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना यूरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. अडवाणी यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


त्यानंतर वयोमानाच्या त्रासामुळे त्यांना पुन्हा बुधवारी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुलेटिन जारी केले होते. ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या निरीक्षणाखाली होते. आज त्यांना अखेर डिस्चार्ज देण्यात आला व घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



अडवाणी यांना ३१ मार्च रोजी भारतरत्न प्रदान


लालकृष्ण अडवाणी यांना ३१ मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उपस्थित होते. ३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी २०१५ मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.


Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत