Ahmednagar news : शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन महिलेसह तिघांना बेदम मारहाण! एकजण ठार

सरपंचासह सहा जणांना अटक; नेमकं काय घडलं?


अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पांगरमल (Pangarmal) येथे शेळ्या चोरल्याच्या संशयावरून जमावाने एका महिलेसह तिघांना मारहाण केली. यात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली असून चांगदेव चव्हाण (Changdev Chavan) असे मयत तरूणाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड (Amol Awhad) तसेच सहा जणांसह इतर अनोळखी २० ते २५ जणांविरूध्द खून , विनयभंग, अ‍ॅट्रोसिटी या कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकं काय घडलं?


मयत चांगदेव चव्हाण हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून मागील नऊ महिन्यांपासून पांगरमलमध्ये राहत होता. फिर्यादीनुसार काल मध्यरात्री एक जमाव चव्हाण यांच्या घरी आला आणि गावात शेळ्या चोरी जात आहेत, असं म्हणत जमावाने चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीत चांगदेव चव्हाण याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने करावाई करत सरपंचासह सहा जणांना अटक केली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा