मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. या तीनही खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्समध्ये अपडेशन केले आहे. यामुळे युजर्सच्या मोबाईल फोन बिलात चांगलीच वाढ होणार आहे. या कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमती ६०० रूपयांपर्यंत वाढवल्या आहेत.
दरम्यान, एक टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने मात्र आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केलेली नाही. आम्ही बोलत आहोत BSNL बद्दल. पब्लिक सेक्टरमधील ही कंपनी अद्याप जुन्या किंमतीवर रिचार्ज प्लान्स देत आहे. कंपनीने यात कोणतीही वाढ केलेली नाही.
BSNLच्या स्वस्त प्लानची यादी
जर तुम्हाला कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटीचा प्लान हवा असेल तर BSNLचा १०७ रूपयांचा प्लान तुम्ही ट्राय करू शकता. हा प्लान ३५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात ग्राहकांना ३ जीबी डेटा आणि २०० फ्री व्हॉईस कॉलिंग मिनिट्स मिळतात.
यानंतर १४७ रूपयांचा प्लान मिळेल. यात ग्राहकांना ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान १० जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देतो. याशिवाय कंपनीचा १५३ रूपयांचा प्लानही आहे यात २६ दिवस व्हॅलिडिटी असते.
या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, २६ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच कंपनीचा २९८ रूपयांच्या प्लानमध्ये युजरला १ जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएएमस मिळतात. हा प्लान ५२ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.
BSNL is government sector this is one of the good news that BSNL has not increase their recharge rates but BSNL has not upgrade their frequency vi jio Airtel companies has upgraded their frequency from 4G to 5G if government improved in BSNL frequency up to 5G then many peoples with use that government Sim