
हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केले आहे. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. अलिगडचे पोलीस कमिश्नर यांना दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यास सांगितले आहे.

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला. हाथरसमधील रतिभानपूर येथे ही ...
त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहे. मात्र सत्संगला आलेल्या अनेक भाविकांचे कुटुंब उद्धवस्त झाल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोश आणि किंचाळ्यामुळे संपूर्ण देश हादरवून गेला आहे.